निखळ सत्य आणि राजकीय सत्य

This is the Marathi translation of https://mariawirthblog.wordpress.com/2016/04/17/truth-and-political-correctness/

काही निमित्ताने मी जर्मनीमध्ये गेले असताना माझ्या प्राथमिक शाळेतील मित्रमैत्रिणींची भेट झाली. त्यातल्या दोघी जणींची तर गेल्या ५० वर्षांत भेट झाली नव्हती. आणि इतक्या दीर्घ काळात आमच्यांत खूप बदल झाला होता. त्यामुळं ओळखणं कठिणही जात होतं. असो. तर आमच्या बोलण्याची गाडी गावातील तुर्की समाजाकडे वळली. ६,००० वस्तीच्या त्या गावात त्यांची संख्या ६००च्या आसपास असेल. पण त्यातले फारसे लोक गावाशी एकरूप झाले नव्हते. त्यातल्या काहींनी गावाच्या अगदी मध्यवर्ती वस्तीतच घरे घेतली होती, एकजण म्हणाली.

कुराण वाचल्यापासून मी अगदी धार्मिक वृत्तीच्या मुस्लींमांच्या बाबतीतही फार सावधपणं वागते, मी तिला म्हटलं. त्यात जे काही लिहिलंय त्याच्याबद्दल श्रद्धा बाळगणारे लोक मुस्लीमेतरांना आपल्या बरोबरीचे कधीच मानणार नाहीत. तसं करायला त्यांना मान्यताच नाही. त्यामुळं, ते जिथं जिथं राहात असतील तिथं तिथं बहुसंख्य होण्याचा प्रयत्न करणारच. आणि ते काम झालं की त्यांची इतरांना नमवण्याकरता गुंडगिरी चालू होणारच म्हणून समजा. आपल्याला त्यांना ठार मारलं नाही तर आपण भाग्यवानच.

क्षणभर शांतता पसरली.  मग त्यांतली एकजण काहीशी धीट आणि भांडखोर बाई म्हणाली,  “मारिया मलाही तुझ्यारासखंच वाटतं. पण तू जे आता म्हणालीस, तसं म्हणायचा मला धीर मात्र व्हायचा नाही मला.”

एखाद्या जमावाची दहशत किती असते, त्याची कल्पना तिच्या त्या शेऱ्यामुळं आली. राजकीय सत्य कसं असतं, ते आता जगभर साऱ्यांना कळून चुकलं आहे. आणि कुठं काय बोलावं, कुठं बोलू नये, ह्याची जाणीवही समाजाला झाली आहे. पण, अशामुळं आपण ज्या उच्चार-स्वातंत्र्याचा आजच्या जगात फारच गाजावजा करीत असतो तेच गमावलं असल्याचं आपल्याला जाणवत नाही, हेही कळून येतं.

हे तर फारच वाईट आणि गुंतागुतीचं आहे. मुक्त बोलण्याचा अधिकार तर आहे. पण प्रत्यक्षात सत्य बोलण्यावर दहशतीचं सावट आहे. अभिव्यक्तीच्या अधिकारात दुसऱ्याचा अधिक्षेप करणं, असत्यकथन करणं यांचाही अंतर्भाव असतो. मात्र, योग्य त्या राजकीय गटातच बोलायचं बंधन असतं अशा वेळी जगभर विचार-स्वातंत्र्याचा मुख्य माध्यमात उच्चरवात गाजावाजाही केला जातो!

असत्यकथनाचं उदाहरण पाहू. ननवर झालेल्या बलात्कारामागं हिंदु दहशतवादी होते, असं सांगण्यात आलं. पण, त्यावर हिंदूंचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. दूरदर्शनच्या कार्यक्रमात ख्रिस्ती प्रतिनिधींनी आणि वामपंथीयांनी आरडाओरड करून त्यांना बोलूच दिलं नाही. कोणताही पुरावा नसूनही बिशप आणि व्हॅटिकन रेडिओनं हिंदूना दोष देऊनही टाकला. आणि प्रत्यक्ष बांगलादेशी मुस्लीमांना त्या अपराधाकरता अटक झाली, तोपर्यंत हिंदूंची प्रतिमा डागळली ती डागळलीच. आणि ती पुसण्याचा प्रयत्नही करण्यात आला नाही. ख्रिस्ती प्रतिनिधींना कोणतीही समज देण्यात आली नाही. आणि कोणतीही क्षमायाचनाही करण्यात आली नाही.

ह्या स्वातंत्र्यालाही एक वेगळी छटा आहे. कुणीही हिदूंच्या किंवा ज्यूंच्या विरुद्ध बोलू शकतात. तसं स्वातंत्र्य असतं. हिंदूंना पूज्य असलेल्या विभूतींची टर उडवणं, विकृत करणं ह्याचं स्वातंत्र्य सर्वांना असतं. पण इतरांविरुद्ध ते करण्याचं नसतं. मुस्लीम आणि ब्रिटिश काळात शतकानुशतकं हिंदूंचा छळ झाला, त्यांनी देवाच्या नावाखाली कसलीही आगळीक केली नसतानाही धर्म बदलण्ची बळजोरी त्यांनी इतरांवर कधी केली नसतानाही, इतरांच्या देवाला, धर्माला नावं ठेवली नसतानाही, कोट्यवधी हिंदूंना ठार केलं. तेच ज्यूंच्या संदर्भातही घडलं. त्यामुळंच सेमिटिक धर्माच्या विरोधकांविरुद्ध वातावरण आज पश्चिमेकडे वाढत आहे. माध्यमाचाही सहभाग आहेच.

याच्या उलट, मुस्लीमांनी, इस्लामनं इतरांवर कितीही शाब्दिक आघात केले, तरी तिकडे दुर्लक्ष करण्यत येतं. गेली १,४०० वर्षं मुस्लीम तरुण आतंकवादाकडे वळत असल्याचं माहीत असूनही आजवर तसंच चालू आहे. मुस्लीम नेहमी आक्रमणच करीत आले, आक्रमणांना तोंड देण्याचा प्रसंग त्यांना कधीच आला नाही. आणि राजकीय कारणांकरता मुस्लीम संप्रदाय शांततेचा उपासक आहे, असंही सांगितलं जातं. याच्या उलट बोलणाऱ्यांवर मुस्लीम द्वेष्टे असा शिक्काही मारला जातो. पण, इस्लाम शांततेचा उपासक कसा आहे, त्या संप्रदायाचे लोक चांगले मानव कसे आहेत, ह्या कशाबद्दल चर्चा मात्र, कधीही घडवून आणली जात नाही.

जर समतोल चर्चा होऊ शकली, तर हिंदु धर्म, कसा सहिष्णु आहे, खुल्या विचारांचा आहे, हे कळून त्याला इंग्रजीत लावण्यात येणारा असहिष्णु हा दोष सुतराम आवश्यक नाही, हे स्पष्ट होईल.

अधिक शांत, समाधानी जीवन जगण्याकरता, सर्व प्रकारच्या स्वभावांच्या लोकांना सहजीवन जगण्याकरता तोच चांगला पर्याय असल्याचंही समजेल. ख्रिस्ती आणि मुस्लीम रिलिजनांची तत्त्वं घट्ट आहेत, तर्काच्या कसोटीवर उतरत नाहीत. त्यामुळं सार्वत्रिक शांतता प्रस्थापित करण्याकरता प्रथम त्यांचंच परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांच्यांत मतभिन्नतेला अवसरच दिला जात नाही.

पण, अशी समतोल किंवा कसल्याही प्रकारांनी चर्चा केल्याच जात नाहीत. उलट हिंदु धर्माच्या बाजूनं कुणी बोलत असेल तर त्यालाच हिंदू मूलतत्त्ववादी म्हणून हुसकून लावलं जातं. आणि कुणी इस्लाम किंवा ख्रिश्चन रिलिजनांच्या बाजूनं बोलत असेल तर विविध वाहिन्यांवरून त्यांचा अचूक दृष्टिकोन म्हणून उदो उदो केला जातो. “हिंदुत्व शांततेकरता झगडतो,” असं कुणी प्रकटपणं बोलल्याचं आढळतात का? तसं तुम्ही कधीच ऐकलं नसेल. आणि आपण कुणी तसं खाजगी रीत्या बोललो तर हिंदु समाजातल्या जातीजातींमधील भांडणांबद्दल बोलून आपल्यालाच गप्प बसवलं जाईल.

सत्य नेमकं काय आहे, ह्याबद्दलची सफल चर्चा आता होऊ शकत नाही, अशा अवस्थेला आपण का आलो आहोत? की आपण ते बाहेर फेकूनच दिलं आहे? असं दिसतंय तरी. निखळ सत्य असं काही नसावंच, असं आता मला वाटायला लागलं आहे. किंवा तसली अनेक सत्य असावीत. किंवा ज्याला जे वाटेल ते सत्य, असं असावं.

आजच्या असल्या उदास करणाऱ्या अवस्थेबद्दल मी जेव्हा उद्गार काढले तेव्हा, माझा एक जर्मन मित्र असंच म्हणाला. “विशेषतः जेव्हा मुस्लीमांबद्दल काही बोलायचं होईल तेव्हा त्याला मोठं धाडसच करावं लागेल. “नखळ सत्य असं काही नसतंच,” तो म्हणाला. मी चमकले. जीवनाला मार्गदर्शक म्हणून काही सत्य नसेलच तर मग आपण आपलं जीवन संपवणंच इष्ट नव्हे का?

निखळ सत्य काय असतं, ते पाह्यला हवं असं मी मित्राला म्हटलं. कारण, ते अस्तित्वात असलं तरी शब्दांत वर्णन करणं शक्य नसतं. काहीसं खालच्या पातळीवर उतरलं तर असत्य हे तर सत्य निश्चितपणं नसतं. मग एखाद्याचा असत्यावरच विश्वास असला आणि खोटंच करायची त्याला सवय असली तरीही. पण, “सत्यं वद, धर्मं चर,” हा प्राचीन ऋषिमुनींचा आदेश आहे.

पण राजकीय सत्य काय ते ठरवणं म्हणजे एक अवघड कार्य आहे, इतकं मात्र खरं.

उदाहरणार्थ, स्त्रीशक्तीची वाढ व्हायला हवी, ह्यात संशय नाही. पण त्या नावाखाली आज जे घडतंय ते अधिकच धोक्याचं आहे, असं वाटतं.

“माझे पती जिथं काम करतात. त्या ठिकाणी मी कशाला जायला हवं? माझं मित्रमंडळ असेल तिथं त्यांनी का येऊ नये?” पाश्चात्त्य देशात हे प्रश्न काही काळापूर्वी स्त्रियांमध्ये महत्त्वाचे गणले जात. परिणामी दांपत्यात विवाहानंतर लगोलग विसंवादालाच आरंभ होई. आणि कुणा एकाला तरी, विशेषतः स्त्रीला, माघार घ्यावी लागे. आणि स्त्रीपुरुष समानतेच्या वातावरणामुळं तिला वैषम्य वाटे.

पुढं लैंगिक समानतेच्या नावाखाली विविध कायदे, तेही स्त्रियांना अनुकूल, बनवावे लागले. परिणामी पुरुषांची केवळ अडचणच झाली असं नव्हे तर पुरुषांना कारावासही घडू लागला. कारण, त्यांचं म्हणणं विचारात घेण्याचंच नाकारलं जाऊ लागलं. नकळत तरी, स्त्रिया म्हणजे देवता आणि पुरुष जंगली, असा समज पसरला. आणि काही झालं तरी ते अनुचितच होतं. त्याचा एक दुष्परिणाम झाल. स्त्रिया आणि पुरुष एकमेकांना उत्तेजन देण्याऐवजी त्यांच्यांत वैरभाव शिरला. परिणामी कुटुंबसंस्था मोडून पडली. कित्येक लोक मानसिक पातळीवर निराधार झाले, कोसळून गेले. तरीही स्त्रीस्वातंत्र्य राजकीय सत्य म्हणून टिकून राहिलंच.

ह्या विषयावरही मुक्त चर्चा व्हायला नको का? पण तशी कुठं होत आहे? स्त्रियांवर टीका केली तर तिचं स्वागत का होत नाही? आरडाऔरडा करून ती हाणून का पाडली जाते? काही ना काही कारणानं सामाजिक जीवन मोडून पाडायचं आहे काय?

१९६० अखेरीस, माझं शालेय शिक्षण संपलं, तेव्हा नुकतीच स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ जर्मनीत चालू झाली होती. त्यासाठी, मी आता कर्तृत्व दाखवाला हवं, अशी हवा पसरली, स्वयंपाक करता यायलाच पाहिजे, असं काही नाही, आणि “शरीर माझं” असल्यामुळं मुलं हवीत की नकोत, हे ठरवायचा अधिकारही मला असायला हवा, असं वातावरण पसरायला लागलं.

१८ महिन्यांचं प्रदीर्घ सैनिकी शिक्षण मुलग्यांकरता अत्यावश्यक होतं. तिथं स्त्रियांनाही प्रवेश मिळायला हवा, ह्याकरता काही स्त्रीवादी लोक लढत होते. मी आणि माझ्याप्रमाणं कित्येक स्त्रिया, आम्ही त्याला विरोध करीत होतो. पण आमचा आवाज कुणी ऐकतच नव्हतं. उलट, त्यांचं म्हणणं जिकडे तिकडे माध्यमांतून रात्रंदिवस ठणाणा करीत होता. खराखोटा प्रचार करीत राहण्याची सांगड फॅसिस्टांबरोबर घातली जाते. पण, त्यांचं कार्य माध्यमांनीच उचललं होतं. आणि त्यांचा प्रभाव किती आहे, हे दिसून येतंच आहे.

आणखी एक धार्मिक स्वातंत्र्याचं उदाहरण घेऊ. युनोनं त्याला अतिपवित्र स्वातंत्र्य म्हणून मान्यता दिलीही आहे. तरीपण घर्म म्हणजे काय त्याची स्पष्ट व्याख्या कुठंच केलेली नाही. मग धर्म म्हणजे काय त्याचा अधिक चिकित्सक विचार करायला नको का? त्यातील सत्य काय, योग्य काय, हे पाह्यला नको काय? तशी चर्चा तरी कुठं होत आहे? तरीही इस्लाम शांततेचा संदेश देतो, ख्रिश्चन प्रेमाचा देतो, आणि हिंदु धर्म म्हणजे अनेक पंथोपपंथांची खिचडी आहे, त्याच्यातले अनेक दोष दूर करायला हवे आहेत, आणि शक्य तर ते कामही पाश्चात्त्य आणि दक्षिण आशिया-तज्ज्ञांकडून करून घ्यायला हवं, असंच सांगितलं जात आहे.

सत्याची उलथापालथ केली जाते आहे काय? आणि ती तरी कशाकरता? हिंसा आणि गोबेल्स पद्धतीच्या प्रचारांतून ज्या धर्मांच्या अनुयायांची संख्या वाढली, त्यांना शांततेचे आणि प्रेमाचे प्रसारक म्हणून पुढं करण्याचा उद्देश काय? खुली चर्चा झालीच तर त्यांच्या पायाखालची वाळूच निसटण्याची आणि हिंदूंचाच वरचष्मा होण्याची शक्यता  अधिक वाटते म्हणून? कारण खऱ्या अर्थानं त्यांचंच तत्त्वज्ञान प्रेम आणि ज्ञानावर आधारलं आहे. लादलेल्या अंधश्रद्धांवर नव्हे.

ऋषिमुनींचं अंतर्ज्ञान तर आधुनिक विज्ञानानंच योग्य ठरवलं आहे. ते खुलं आहे. कुणीही स्वतः पडताळून पाहू शकतो. मात्र, त्याकरता अंतःकरणाची शुद्धता प्राप्त करून घ्यायला हवी. त्याच्या उलट पोथीनिष्ठ संप्रदायांची अवस्था आहे. मुल्ला किंवा पाद्री यांचं सांगणं सत्य की असत्य हे समजण्याकरता आपला मृत्यू व्हायला हवा, तेव्हाच ते कळायचं!

ऋषींनी सत्याचा शोध घेतला. आपलं म्हणणं इतरांवर लादणारे संप्रदाय त्यांना कळत नव्हते. स्त्रियांकरता काय उचित ह्याचीही चर्चा त्यांनी केली. आयुष्य सार्थकी कसं लावायचं, हा त्यांच्यापुढचा खरा प्रश्न होता. आणि आपण स्वतः कोण ह्याच्या उत्तरात त्याचं उत्तर सामावलेलं होतं.

त्या सत्याचा अंतर्भाव आपण आपापल्या जीवनात करू या. राजकीय सत्याच्या मागं धावणं व्यर्थ होय. अंतिमतः त्याच सत्याचा विजय होईल. कदाचित, हे विचित्र वाटेल.  पण, जर आपण याचा आदर केला तर  तेच टिकेल आणि त्यातच आपल्य जीवनातं सार्थक असेल.

सत्यमेव जयते।

मारिया विर्त

अनुवाद: प्रा. मनोहर रा. राईलकर

2 comments

  1. D. Gandhi · · Reply

    Excellent article , true to core. Indeed situation is so , if this is allowed to go then humanity is at great risk to loose moral values completely !!! and that would be social disaster

  2. Sadhana · · Reply

    आणि ते काम झालं की त्यांची इतरांना नमवण्याकरता गुंडगिरी चालू होणारच म्हणून समजा. आपल्याला त्यांना ठार मारलं नाही तर आपण भाग्यवानच.>>>>>>>> These words have come true yesterday in Munich….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: